'हाउडी, मोदी' कार्यक्रम होणारच; तयारी अंतिम टप्प्यात

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच सुमारे 50 हजार अमेरिकी-भारतीय उपस्थित राहणार आहेत.

ह्युस्टन : टेक्‍सास प्रांतात झालेल्या मुसळधार पावसाचा 'हाउडी, मोदी' कार्यक्रम आयोजकांच्या मनावर कोणताही परिणाम झाला नसून, त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच सुमारे 50 हजार अमेरिकी-भारतीय उपस्थित राहणार आहेत. ख्रिस्ती धर्मगुरू पोप वगळता इतर कोणत्याही परदेशी पाहुण्याच्या कार्यक्रमाला झालेली ही सर्वांत मोठी गर्दी असेल. 'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम उद्या (ता. 22) अमेरिकेतील सर्वांत मोठ्या स्टेडियमपैकी एक असलेल्या एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केला आहे.

Image may contain: 1 person, text

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे दीड हजार स्वयंसेवक झटत आहेत. या भागात शुक्रवारी (ता. 20) मोटार रॅलीही आयोजित करण्यात आली होती. भारत आणि अमेरिकेतील मैत्रीचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात असल्याचे 'टेक्‍सास इंडिया फोरम'च्या प्रवक्‍त्या प्रीती दावरा यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- जाणून घ्या कोणी दिल्या, काँग्रेसला कोट्यवधींच्या देणग्या?

- पवारांनी जेवढी विमानतळे बनवली, तेवढे बसस्टॉप त्यांच्याकडे नाहीत

- Vidhan Sabha 2019 : विधानसभा प्रचारास मिळणार अवघे बारा दिवस

- 'हाउडी मोदी'वर पावसाचे सावट; अमेरिकेच्या टेक्‍सासमध्ये आणीबाणी जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Houston set to welcome PM Narendra Modi for program Howdy Modi