First Period : मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यानंतर जगातल्या 'या' ठिकाणी केला जातो जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

First Period

First Period : मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यानंतर जगातल्या 'या' ठिकाणी केला जातो जल्लोष

First Period : काही लोकांना आजही पीरियड्सवर मोकळेपणाने बोलायला संकुच वाटतो. काही लोक असेही आहे जिथे घरी जर मुलींना पीरियड्सदरम्यान अनेक गोष्टींवर बंधने लागू केली जातात. मात्र जगातील असे काही ठिकाणे आहे जिथे पीरियड्सशी संबंधीत अनेक वेगवेगळ्या प्रथांचे पालन केले जाते.

आज आम्ही तुम्हाला जगातील काही अशा खास ठिकाणांविषयी सांगणार आहोत की जिथे मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यावर जल्लोष साजरा केला जातो. (how the traditions of First Period celebrated all around the world read story )

जपान

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की पीरियड्सला घेऊन जपानमध्ये एक खास प्रथा आहे. पीरियड्सला एका पवित्र नजरेने पाहिले जाते.

जपानमध्ये मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यानंतर मुलीची आई  लाल तांदळाचा भात बनवते आणि या भातामध्ये बीन्स, तिल आणि शेंगदाणे टाकतात. या डिशला पुर्ण कुटूंब आस्वाद घेत खातात आणि मुलीच्या पहिल्या पीरियड्सचा जल्लोष साजरा करतात.

इटली

इटलीमध्ये मुलीला पहिल्यांदा पीरियड्स आल्यावर तिला 'Signora' म्हणजेच यंग लेडी म्हटले जाते आणि लोक तिला शुभेच्छा देत जल्लोष साजरा करतात. या दिवसाला शुभ दिवस मानला जातो.

ब्राझील

ब्राझीलमध्ये जर घरी कोणत्याही मुलीला पीरियड्स आले तर खूप खास प्रकारे या क्षणाला सेलिब्रेट केले जाते. येथे पीरियड्सविषयी नातेवाईक आणि मित्रमंडळींना सांगितले जाते. या प्रथेत घरचे सर्व पुरुषही सहभागी होतात आणि जल्लोषातही साजरा होतात.

ब्राजीलमध्ये हा दिवस फक्त मुलीसाठी नाही तर घरच्या लोकांसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो.

फिलीपीन्स

फिलीपीन्समध्ये पीरियड्ससंबंधीत एक अनोखी प्रथा आहे. पहिल्यांदा ज्या मुलीला पीरियड्स येतात त्या मुलीची आई मुलीचे कपडे धुते. फिलीपीन्समध्ये अशीही मान्यता आहे की पीरियड्स आल्यानंतर मुलीला तीन पायऱ्यांवरुन उडी मारायची असते.

याचा अर्थ तीन दिवस तीन याच अवस्थेत असणार. फिलीपीन्समध्ये लोकं मुलीच्या पहिल्या पीरियड्सनंतर एकमेकांना शुभेच्छा देतात.