esakal | ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’
sakal

बोलून बातमी शोधा

‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’

गेल्या वर्षी मोदी आणि ट्रम्प यांच्या ‘हाऊडी मोदी’आणि ‘नमस्ते ट्रम्प’या दोन ऐतिहासिक रॅलीतील हे व्हिडिओ आहेत.दरम्यान,अशाच प्रकारचा व्हिडिओ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सिद्ध केला होता.

‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिडिओचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षी मोदी आणि ट्रम्प यांच्या ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या दोन ऐतिहासिक रॅलीतील हे व्हिडिओ आहेत. दरम्यान, अशाच प्रकारचा व्हिडिओ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सिद्ध केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदी व ट्रम्प ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हातात हात घालून चालतानाचा हा एकत्रित व्हिडिओ १०७ सेकंदाचा आहे. ‘आणखी चार वर्षे’ नावाच्या  व्हिडिओत ट्रम्प यांना अध्यक्षपदाची आणखी एक संधी देण्याचे आवाहन केले आहे. मेलिना ट्रम्प यावर्षी भारत दौऱ्यावर असतानाच्या व्हिडिओचा भागही या व्हिडिओला जोडण्यात आला आहे. त्यात त्या अहमदाबादेत जनसमुदायाला हात हालवून अभिवादन करताना दिसतात. शेवटी ट्रम्प अमेरिकेच्या भारताबरोबरच्या मैत्रीची  ग्वाही देताना दिसतात.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोबेल पुरस्कारासाठी  ट्रम्प यांचे नामांकन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे २०२१च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. नॉर्वेच्या संसदेचे सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेड यांनी ते दाखल केले. आत्तापर्यंत या पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था मिळून ३१८ जणांनी नामांकन केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील सीमावादाबरोबरच इस्राईल-संयुक्त अरब अमिरातीमधील शांततेसाठीही प्रयत्न केल्याचा दावा टायब्रिंग-गजेड यांनी केला आहे. नोबेल शांतता पुरस्कारासाठीच्या इतर नामांकन केलेल्या व्यक्तींपेक्षा ट्रम्प यांनी देशांदेशात शांतता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न केला आहे.