'हाउडी मोदी'वर पावसाचे सावट; अमेरिकेच्या टेक्‍सासमध्ये आणीबाणी जाहीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम रविवारी (ता.22) रोजी ह्यूस्टनमध्ये होणार असून, त्याची जय्यत तयारी झाली आहे. मात्र, गुरुवारी (ता.19) टेक्‍सासमध्ये धडकलेल्या 'इमेल्डा' या वादळामुळे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे ह्यूस्टनमधील अनेक ठिकाणांना पुराचा फटका बसला आहे. या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे ह्यूस्टनमधील अनेक भाग जलमय झाले असून, वीज पुरवठा खंडित झाला आहे.

रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यास सुरवात झाली आहे. टेक्‍सासचे गव्हर्नर ग्रेग अबोट यांनी आग्नेय टेक्‍सासच्या 13 प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पावसाचे प्रमाण आज कमी झाले असले तरी, येथील फोर्ट बेंड, हॅरिस आणि गाल्व्हस्टोन या भागात प्रत्येक तासात दोन ते तीन इंच पाऊस नोंदविला आहे. 

Image may contain: 1 person, text

पावसाने ह्यूस्टनमधील जनजीवन विस्कळित झाले असले तरी 'हाउडी मोदी' कार्यक्रम सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. हा भव्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीड हजार कार्यकर्ते रात्रंदिवस काम करीत आहेत. रविवारी अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रम पार पडेल, असे प्रमुख कार्यकर्ते अचलेश अमर यांनी सांगितले. अमेरिकेतील भारतीयांची वाढती संख्या, शक्ती यांचे दर्शन ह्यूस्टन आणि संपूर्ण अमेरिकेला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह विविध राज्यांचे गव्हर्नर, अमेरिका काँग्रेसचे सदस्य, महापौर व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

'आम्ही खंबीर आहोत!' 
'हाउडी मोदी' हा कार्यक्रम म्हणजे एक कौटुंबिक उत्सव आहे. 'येथील भारतीयांकडे पाहा! आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आम्ही खंबीर आहोत. ह्यूस्टनसाठी आम्ही चांगले काम केले आहे, हे सर्व आम्ही मोदी यांना दाखविणार आहोत,'' असे आयोजकांनी स्पष्ट केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Chandrayaan2 : 'नासा'लाही नाही सापडला विक्रम...

- चिकू भैय्या की तेरे नाम? तुम्हीच बघा विराट कोहलीचा हा लूक!

- काश्‍मीरबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा नाहीच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Howdy Modi program likely to be canceled due to heavy rain