अमेरिकेकडे झेपावते आहे शक्तिशाली सागरी वादळ...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

वाऱ्यांचा वेग ताशी 209 किमीपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता प्रत्यक्षात उतरल्यास हार्वे हे गेल्या 12 वर्षांत अमेरिकेस धडकलेले सर्वांत शक्तिशाली वादळ असेल

वॉशिंग्टन - अमेरिकेतील टेक्‍सास व लुईसियाना या राज्यांस हार्वे या सागरी वादळाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या वादळाची तीव्रता अधिकाधिक वाढत असून यामुळे या भागात वित्तहानीबरोबरच जीवितहानी होण्याचीही भीती आहे.

या वादळामुळे या भागात सध्या ताशी 140 किमी वेगाने वारे वाहत असून वादळाचा प्रत्यक्ष भूमीस फटका बसताना वाऱ्यांचा वेग ताशी 209 किमीपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता प्रत्यक्षात उतरल्यास हार्वे हे गेल्या 12 वर्षांत अमेरिकेस धडकलेले सर्वांत शक्तिशाली वादळ असेल. या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर धोकादायक भागांमधून नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

टेक्‍सास हा अमेरिकेतील तेल उद्योगाचा प्रमुख भाग आहे. या पार्श्‍वभूमीवर या वादळाचा फटका तेल उद्योगास बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Web Title: Hurricane Harvey menaces Texas, Louisiana