मी कोणती मदत मागितली नाही; मुशर्रफ यांचे घुमजाव

यूएनआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

इस्लामाबाद - पाकिस्तान सोडण्यासाठी आपण कोणाकडेही मदत मागितली नव्हती, असे विधान पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी आज केले. माध्यमांनी आपल्या मागील वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी आपल्याला पाकिस्तान सोडण्यास मदत केल्याचा गौप्यस्फोट मुशर्रफ यांनी केला होता. मात्र आज या विधानावर मुशर्रफ यांनी घुमजाव करीत आपण शरीफ किंवा अन्य कोणाकडेही अशा प्रकारची मदत मागितली नाही. याविषयी कोणाबरोबरही आपली चर्चाही झालेली नव्हती, असे म्हटले आहे.

मुशर्रफ यांनी न्यायालयाकडे उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र सरकारच्या दबावामुळे ते शक्‍य होत नव्हते. राहील शरीफ यांनी न्यायालयांवर प्रभाव टाकत आपल्याला ही परवानगी मिळवून दिली, असे मुशर्रफ यांनी मागे दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

Web Title: I don't demanded any help : Musharaf