गर्भाशयात जुळ्यांनी केली भांडणं; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

मातेच्या गर्भाशयातून जन्म झाल्यानंतर दोन भावंड एकमेकांशी भांडण करत असतात, याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. परंतु, येथील एका मातेच्या गर्भाशयात जन्माआधीच जुळी मुलं भांडण करताना दिसली.

बीजिंग: चीनमध्ये एका मातेची सोनोग्राफी करत असताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या मातेच्या गर्भाशयामधील जुळी मुलं एकमेकांशी भांडण करताना दिसली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मातेच्या गर्भाशयातून जन्म झाल्यानंतर दोन भावंड एकमेकांशी भांडण करत असतात, याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. परंतु, येथील एका मातेच्या गर्भाशयात जन्माआधीच जुळी मुलं भांडण करताना दिसली. या अल्ट्रासाउंड व्हिडीओबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'गर्भाशयातील भांडणाचा व्हिडीओ साधारणतः वर्षभरापूर्वी व्हायरल करण्यात आला होता. ही महिला चार महिन्यांची गर्भवती होती आणि ती जुळ्या बाळांना जन्म देणार होती. त्यावेळी तिने चीनमधील यिनचुआनमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड केले होते. त्यावेळी या बाळांच्या वडिलांनी भांडणाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.' पत्नीच्या पोटातील अर्भकं बराच वेळ एकमेकांशी भांडण करताना दिसल्याने तो कॅमेऱयात कैद केला आहे. मूळ व्हिडीओ 2.5 मिलियन नेटिझन्सनी पाहिला असून, 80 हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. असे महिलेच्या पतीने सांगितले.

दरम्यान, महिलेची प्रसुती झाली असून, तिने दोन मुलींना जन्म दिला आहे. एकीचं नाव चेरी आणि दुसरीचं नाव स्ट्रॉबेरी ठेवण्यात आले आहे. पोटात असताना दोघी भांडत होत्या. परंतु, आता दोघींचे एकमेकींवर खूप प्रेम असल्याचे पहायला मिळते.

Web Title: Identical twins spotted fighting inside mothers womb during ultrasound video viral