बांगलादेशात मिळाली भगवान विष्णूची मूर्ती

बांगलादेशमधील एका शिक्षकाकडून पोलिसांनी भगवान विष्णूची एक मूर्ती ताब्यात घेतली.
Lord Vishnu Idol
Lord Vishnu IdolSakal

ढाका - बांगलादेशमधील (Bangladesh) एका शिक्षकाकडून (Teacher) पोलिसांनी (Police) भगवान विष्णूची (Vishnu) एक मूर्ती (Idol) ताब्यात घेतली आहे. ही मूर्ती एक हजार वर्षांहून अधिक जुनी असून काळ्या पाषाणात कोरलेली आहे.

कमिला जिल्ह्यातील बोरो गावली गावातून पोलिसांनी ही मूर्ती ताब्यात घेतली आहे. मूर्तीची उंची २३ इंच असून रुंदी ९.५ इंच आहे. मूर्तीचे एकूण वजन १२ किलो आहे. अबू युसुफ या शिक्षकाला दीड महिन्यांपूर्वीच ही मूर्ती सापडली होती. तलावासाठी खोदकाम सुरु असताना त्याला मूर्ती मिळाली. मात्र, त्याने याबाबतची माहिती लपवून ठेवली होती. युसूफ यांनी माहिती लपवू ठेवल्याचा आरोप फेटाळला आहे. कामात व्यग्र असल्याने माहिती देण्याचे लांबणीवर पडत होते, असे त्यांनी सांगितले.

ही मूर्ती फार प्राचीन असून ती अत्यंत मौल्यवान आहे. ती तातडीने संग्रहालयात ठेवून तिचे योग्य प्रकारे जतन करायला हवे, असे मत येथील पुरातत्व खात्याने व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com