'पाकिस्तानने साथ न दिल्यास कडक रणनीतीची गरज'

पीटीआय
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक रणनीती आखण्याचा विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या आघाडीच्या "थिंक टॅंक'ने म्हटले आहे. 

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक रणनीती आखण्याचा विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या आघाडीच्या "थिंक टॅंक'ने म्हटले आहे. 

थिंक टॅंक अटलांटिक कौन्सिलने मंगळवारी आपला अहवाल सादर केला. जर पाकिस्तानची भूमिका सकारात्मक राहिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक धोरणाचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे. या थिंक टॅंकमध्ये अमेरिकेचे सेवानिवृत्त जनरल डेव्हिड पेट्रियस, सीआयएचे माजी संचालक आणि अफगाणिस्तानातील अमेरिकेचे माजी राजदूत जेम्स कनिंघम आणि अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांचा समावेश आहे. पाकिस्तानातील नेतृत्व बदल आणि अफगाणिस्तानसह पाकिस्तानच्या विभागीय धोरणावर असणारा सैनिकांचा प्रभाव पाहता अमेरिकेने पाकिस्तानशी चर्चा करण्यात वेळ घालवू नये, असे अहवालात म्हटले आहे. अर्थात, पाकिस्तान हा नेहमीच दहशतवाद्यांना बळी पडला आहे आणि दहशतवाद्यांशी लढण्यात बरेच काही गमावले आहे. मात्र, देशातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाई करणे आणि अमेरिकेला दहशतवाद्यांविरुद्ध साथ देण्याच्या प्रयत्नातून आतापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. अफगाणिस्तानने भारताला सोबत घेऊन पाकिस्तानची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानने भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबरचे संबंध संतुलित असल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताला अफगाणिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तान आणि त्यांच्या नागरिकांना हानी पोचवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा अहवालात उल्लेख आहे.

अफगाणिस्तानात भारताची भूमिका सकारात्मक राहिली आहे आणि पाकिस्तानला कोणतीही हानी न पोचवता भारत सर्वच क्षेत्रात मदत करू शकतो, जेणेकरून अफगाणिस्तानच्या स्थितीत सुधारणा होऊ शकेल.

Web Title: If Pakistan not supports then its need to strong strategies