आम्ही 'स्ट्राईक' केल्यास तो कायम लक्षात राहील

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद  : पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक केला, तर अनेक पिढ्यांपर्यंत भारताला हा हल्ला लक्षात राहील, असे उद्दाम वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आज केले.

खैबर भागात शाहिद आफ्रिदी याच्या नावाने उभारलेल्या क्रिकेट स्टेडियमचे उद्‌घाटन जनरल शरीफ यांच्या हस्ते झाले. या वेळी शरीफ म्हणाले,""पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला, तर भारताला ही घटना त्यांच्या मुलांना अभ्यासक्रमातून शिकवावी लागेल. भारताकडून सातत्याने शस्त्रसंधी भंग होत असताना पाकिस्तानने आतापर्यंत संयम बाळगला आहे. मात्र, सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्यास तो सहन करणार नाही.''

भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. दरम्यान, जनरल शरीफ यांनी "आयएसआय'ला घुसखोरीच्या आणि हल्ल्याच्या तयारीत राहण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. निवृत्त होण्यापूर्वी "आयएसआय'च्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना सक्रिय करण्याचा जनरल शरीफ यांचा इरादा असल्याचे समजते. शरीफ हे 29 तारखेला निवृत्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्करानेही आंतरराष्ट्रीय आणि नियंत्रण रेषेवरील जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: if we carry out a strike it can not be forgotten forever- pakistan