विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्....

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पत्नीने शारिरीक कारण सांगून पतीला हात लावू दिला नाही. परंतु, विवाहाच्या 15 दिवसानंतर समजले की पत्नी ही महिला नसून, पुरूष आहे. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

कंपाला (युगांडा): दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पत्नीने शारिरीक कारण सांगून पतीला हात लावू दिला नाही. परंतु, विवाहाच्या 15 दिवसानंतर समजले की पत्नी ही महिला नसून, पुरूष आहे. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

प्रेयसीला रात्री शेतात भेटायला बोलावले अन्‌...

युगांडामध्ये राहणाऱ्या एका इमामाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. दोन आठवडयांपूर्वी मोहम्मद मुतुंबा (वय 27) यांचा पारंपारिक पद्धतीने एका तरुणी बरोबर निकाह झाला. विवाहानंतर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. विवाहानंतर युवती शारिरीक कारण सांगून पतीला हात लावून देत नव्हती. शिवाय, घरामध्ये वावरताना पूर्ण शरीर झाकेल असे कपडे घालत होती. यामुळे कोणाला संशय येत नव्हता. काही दिवसांनी मासिक पाळीचे कारण देऊन शरीरसंबंध टाळले. पती-पत्नीमधील संबंधाबाबत कुटुंबामध्ये काही माहिती नव्हती. यामुळे सर्वकाही सुरळीत असल्याचे कुटुंबियांना वाटत होते.

प्रेयसी कोणत्याही वेळी घरी यायची अन्...

एक दिवस इमामाच्या घराशेजारी राहणाऱया शेजारील व्यक्तीने आपल्या घरामधून वस्तू चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवविवाहितेवर केला. शिवाय, भिंतीवरून उडी मारल्याचेही पाहिले. यामुळे शेजारील व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीसाठी इमाम आणि त्याच्या पत्नीला बोलावले. पोलिस ठाण्यात येताना इमामाच्या पत्नीने मुस्लिम स्त्रियांसाठीची पारंपारिक वेशभूषा केली होती. इमामाच्या पत्नीची तपासणी करताना ती महिला नसून पुरुष असल्याचे जाणवले. यामुळे महिला पोलीस अधिकारी चक्रावून गेली. शेवटी, महिला असल्याचे भासवण्याचे प्रयत्न करणारी इमामाची पत्नी पुरुष असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले.

Richard Tumushabe pretended to be a woman so he could marry the imam and steal his money, local media in Kayunga reported. Picture: Fred Muzaale/DailyMonitor

दरम्यान, पोलिसांची चौकशी सुरु असताना केवळ पैशांसाठी महिला बनून इमामाची फसवणूक केली आहे, असे पोलिसांना सांगितले. महिला बनून पुरुष असणाऱया व्यक्तीचे नाव रिचर्ड तुमुशाबे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा गोड आवाज व महिलांसारखी चालत असल्यामुळे फसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

महिलेने केला अल्पवयीन मुलावर बलात्कार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imam suspended after discovering bride is a man at uganda