Imran Khan : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ; पाक सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan ex pm imran khan updates

Imran Khan : इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ; पाक सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान ही अटक बेकायदेशीर असल्याचे पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यांची ताबोडतोड सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इम्रान खान यांच्यासोबत न्याय झाला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने इम्रान खान यांची लगेच सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना उद्या (शुक्रवार) इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने आपल्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर आपल्याला लाठीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

न्यायालयाने असेही स्पष्ट केली की, एजन्सीने न्यायालयाच्या आवारात प्रवेश करून आणि रजिस्ट्रारच्या परवानगीशिवाय खानला अटक करून "न्यायालयाचा अवमान" केला आहे.

सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मोहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हे निर्देश दिले.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान ७० वर्षीय खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :imran khan