शरीफ यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण नाही; इम्रान खान सरकारचा निर्णय

nawaz-sharif
nawaz-sharif

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांची नाकेबंदी करण्यासाठी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार हरप्रकारे प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरीफ यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण केले जाणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गृह मंत्री शेख रशीद यांनी ही घोषणा केली. बुधवारी मध्यरात्रीच पासपोर्टची मुदत संपत आहे. इम्रान यांच्याच आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येईल, असे रशीद यांनी सांगितले. शरीफ तसेच त्यांची मुलगी मरीयम यांच्यावर २० ऑगस्ट २०१८ पासून परदेशी प्रवासाचे निर्बंध आहेत. अशा यादीत नाव असलेल्यांना पासपोर्ट जारी केले जात नाहीत, तसेच त्याचे नूतनीकरणही केले जात नाही, अशी माहिती रशीद यांनी दिली.

७० वर्षीय शरीफ शरीफ सध्या लंडनमध्ये आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे ते प्रमुख आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी चार आठवड्यांच्या मुदतीसाठी परदेशी जाण्यासाठी अर्ज केला होता. लाहोर उच्च न्यायालयाकडून त्यांना परवानगी मिळाली होती. नंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना परतण्याचा आदेश दिला, मात्र त्याचे पालन शरीफ यांनी केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये ते गुन्हेगार असल्याचे जाहीर केले.

नवाझ शरीफ यांना पाकमध्ये परत यायचे असेल तर आमचे सरकार त्यांना विशेष प्रमाणपत्र देईल. मुळात त्यांचे नाव परदेशी प्रवासास मनाई असलेल्या व्यक्तींच्या यादीत होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही ते मायदेशी परतलेले नाहीत.
- शेख रशीद, पाक गृह मंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com