इम्रान खान होणार पाकचे पंतप्रधान?; 'पीटीआय' आघाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी या निवडणुकीत जनादेशाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर निवडणूक आय़ोगाने यांचा आरोप फेटाळून लावला आहे. पीएमएल-एनने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानात अकराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रात्री सुरू झालेल्या मतमोजणीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्ष (पीटीआय) 121 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांच्या पीटीआय पाठोपाठ माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पीएमएल-एन 68, तर पाकिस्तान पीपल्स पार्टी 41 जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीतील कल कायम राहिल्यास इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात. इम्रान यांचा पक्ष अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच पुढे गेला असून, त्यांना बहुमतासाठी अवघ्या काही जागांची आवश्यकता आहे. 

पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी या निवडणुकीत जनादेशाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर निवडणूक आय़ोगाने यांचा आरोप फेटाळून लावला आहे. पीएमएल-एनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होण्याची पाकिस्तानच्या 70 वर्षांच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. पाकिस्तानमध्ये बुधवारी 272 जागांसाठी मतदान झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan Pakistan Tehreek-e-insaf leads in Pakistan general elections