...तर पाकिस्तानची मानहानी झाली नसती : इम्रान खान

वृत्तसंस्था
रविवार, 7 जानेवारी 2018

नवाज शरीफ यांच्यासारखे नेते आपली हाव पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतले आणि त्यांनी पैसा परदेशांमध्ये साठवून ठेवला. हे नेते असे नसते तर अमेरिकेकडून मदत मागण्याची वेळच आली नसती आणि सध्या होत असलेली मानहानी झाली नसती

इस्लामाबाद - परदेशांमध्ये काळा पैसा साठवून ठेवण्यात आमचे नेते गुंतले नसते तर निधी रोखण्याबाबत अमेरिकेकडून सध्या होत असलेली मानहानी झाली नसती, अशी कडवट टीका पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे.

एका मुलाखतीदरम्यान इम्रान खान म्हणाले की, नवाज शरीफ यांच्यासारखे नेते आपली हाव पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतले आणि त्यांनी पैसा परदेशांमध्ये साठवून ठेवला. हे नेते असे नसते तर अमेरिकेकडून मदत मागण्याची वेळच आली नसती आणि सध्या होत असलेली मानहानी झाली नसती. अफगाणिस्तानमधील अपयशासाठी अमेरिका पाकिस्तानला दोष देत आहे, मात्र या युद्धामुळेच पाकिस्तानमधील आदिवासी भागावर विपरित परिणाम झाला, अशी टीकाही खान यांनी अमेरिकेवर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imran khan pakistan usa