
अमेरिकेच्या इलिनॉयमध्ये परेडदरम्यान गोळीबार 6 ठार, 16 जखमी
शिकागो : अमेरिकेतील शिकागो येथे स्वातंत्र्य दिन परेड दरम्यान झालेल्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आतपर्यंत कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. शिकागो सन-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सकाळी 10 वाजता परेड सुरू झाली त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनी गोळीबार सुरू झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिकेतील शिकागो येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अचानाक 22 वर्षीय युवकाने परेडवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे एकच खळबळ आणि गोंधळ उडाला. ही घटना अमेरिकन वेळेनुसार सकाळी दहाच्या सुमारास शिकागो, इलिनॉय येथील हायलँड पार्कमध्ये घडली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून, 59 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेनंतर तपासादरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी एक रायफल जप्त केली आहे.
आरोपीची ओळख पटली
या घटनेनंतर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून, गोळीबार करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. आरोपीला तात्काळ पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीचा फोटो जारी केला असून, पोलिसांना आरोपीची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार रॉबर्ट ई क्रेमो उर्फ बॉबी असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे ना असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title: In July 4 Us Parade Shooting Suspect Held Hours After 6 Killed Dozens Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..