esakal | पाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केला बलात्कार, इम्रान खान ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

पाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केला बलात्कार, इम्रान खान ट्रोल

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: पाकिस्तानात लैंगिक विकृतीचा एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या (pakistan) ओकारामध्ये (okara) एका बकरीवर बलात्कार (rape on goat) करुन तिची हत्या (Murder) करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एका मजुराने ही बकरी पाळली होती. पाचही आरोपी बकरीला नजीकच्या कपाऊंडमध्ये घेऊन गेले व त्या मुक्या जनावरावर बलात्कार केला. (In Pakistan rape & kill a goat pakistan pm Imran Khans troll dmp82)

बकरीची हत्या करण्याआधी आरोपींनी तिचा छळ केला. हे क्रूर कृत्य केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. स्थानिकांच्या हवाल्याने काही माध्यमांनी वृत्त दिले आहे. पाकिस्तानात या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बकरीवरील बलात्कारच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर युझर्सनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काही प्रश्न विचारले आहेत. बकरीने सुद्धा पेहरावामध्ये सभ्यता पाळायला पाहिजे होती का? असा सवाल एकाने विचारला आहे.

हेही वाचा: विदर्भातील व्यावसायिकाने मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेलवर केला बलात्कार

पाकिस्तानी अभिनेत्री माथिराने इन्स्टाग्रामवर बकरीच्या बलात्काराची बातमी शेअर केलीय व बकरीला सुद्धा संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालायला पाहिजे होते का? असा सवाल केला आहे. नेकेड प्राणी पाहिल्यानंतर माणसांवर परिणाम होतो का? असा सवाल एका टि्वटर युझरने विचारला आहे. आता हँडसम पंतप्रधान बकरीला पूर्ण अंग झाकून घ्यायला सांगतील, असे या युझरने म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलेय.

हेही वाचा: लोकलसाठी प्रवाशीच करणार विनातिकिट आंदोलन, वकिल लढवणार मोफत खटला

इम्रान खान यांनी काय विधान केले होते?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विशेष म्हणजे महिलांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे ते आता दुसऱ्यांदा वादात सापडले आहेत. देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांसाठी महिलांचे कपडेच जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. विशेष म्हणजे मागे एकदा अशाच कपड्यांवरुन केलेल्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले होते. यावेळी मात्र, त्यांनी पुन्हा कपड्यांवरुनच केलेलं वक्तव्य चर्चेस पात्र ठरलं आहे.

पाकिस्तानमध्ये महिलांवरील आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरुनच पंतप्रधान इम्रान खान यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. 'अ‍ॅक्सिओस ऑन एचबीओ' ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, जर एखादी महिला खूपच तोकडे कपडे परिधान करत असेल तर त्याचा पुरुषावर परिणाम होणारच. ते रोबोट्स नाहीयेत. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

loading image
go to top