भारत-चीन सीमारेषेवर तणाव, अमेरिकेने घेतली ही भूमिका

india, china, ladakh, america
india, china, ladakh, america

वाशिंग्टन :  लडाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-चीन सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेने आपली भूमिका मांडली आहे. चीनकडून सीमारेषेवर सुरु असलेल्या कुरापती या अयोग्य असल्याचे सांगत अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुद्यानंतर अमेरिकेने तिबेट धर्मगुरुच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यात आता आणखी एक भर पडली असून लडाख परिसरातील चीनच्या हालचालीवर आक्षेप नोंदवत अमेरिकेने भारताच्या खांद्यावरुन चीनवर निशाणा साधल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीच्या चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता अमेरिकेच्या या भूमिकेचीही चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 
लडाखच्या मुद्यावरुन भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या वातावरणाबाबत अमेरिकेने बुधवारी आपली भूमिका मांडली. सीमारेषेवर चीनकडून सुरु असलेल्या हालचालींवर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सहाय्यक सचिव एलिस वेल्स यांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. चीनचे कृत्य हे चीथावणी देणारे असून त्रासदायक असल्याचे एलिस वेल्स या महिला अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चीन म्हणतंय लस नाही; पण हे औषध कोरोनावर करु शकते मात 

भारताच्या सीमेलगत चीनकडून होणाऱ्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लडाखमधील गलवा आणि पेंगोंग त्सो परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताचे वरिष्ठ सैन्य अधिकारी सीमारेषेवर बारिक लक्ष ठेवून असल्याचे समजते. चीनची आक्रमक भूमिका धोकादायक असल्याचे सांगत अमेरिकने भारताची बाजू घेतल्याचे पाहायला मिळते.

एलिस वेल्स म्हणाल्या आहेत की, भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती हा चिंतेचा विषय आहे. प्रशांत महासागरातील एका पट्टयाला 'दक्षिण चीन समुद्र' म्हणून त्यांनीच दिलेले नाव आणि त्यातील उत्खननाने निर्माण झालेला वाद आणि भारताला लागून असलेला लडाखचा भाग असो यासंदर्भात चीनकडून होणारे आक्रमण अयोग्य आहे, असे एलिस वेल्स यांनी म्हटले आहे. चीन आपल्या वाढत्या शक्तीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com