भारत अन् चीनला मिळणाऱ्या लाभावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टीका

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था बनल्या असून त्यांना विकसनशील देशांप्रमाणे लाभ देणं थांबवलं पाहिजे असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था बनल्या असून त्यांना विकसनशील देशांप्रमाणे लाभ देणं थांबवलं पाहिजे असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक व्यापार संस्थे(डब्ल्यूटीओ)ला विकसनशील देशांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता असल्याचे मतही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. भारत अन् चीन या दोन्ही देशांना WTOमधून मिळणारे फायदे तात्काळ बंद करायला हवेत असेही त्यांनी म्हटले आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करताना ट्रम्प बोलत होते.

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर दंडात्मक कर आकारल्यानंतर चीननंही ट्रम्प यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. कोणत्या देशाला कशा प्रकारे विकसनशील देशाचा दर्जा मिळतो हे WTOनं स्पष्ट करावं, असंही जुलैमध्ये ट्रम्प यांनी सांगितलं होतं. चीन, तुर्कस्थान आणि भारतासारख्या देशांना मिळणारे लाभ बंद करण्याच्या उद्देशानंच ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे.

कोणतीही विकसित अर्थव्यवस्था WTOतून फायदा मिळवत असल्यास त्या देशावर दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकारही ट्रम्प यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधीं(यूएसटीआर)ना बहाल केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china no longer developing nations said donald trump