पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

वॉशिंग्टन : 'पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या चीनच्या हालचाली सुरू आहेत', असा अहवाल अमेरिकी गुप्तचर संघटना 'सीआयए'चे मुख्यालय 'पेंटॅगॉन'ने प्रसिद्ध केला आहे. 'दीर्घकाळापासून मैत्रीचे संबंध असलेल्या देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करून चीन त्यांना स्वत:च्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे', असेही त्यात म्हटले आहे.

वॉशिंग्टन : 'पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या चीनच्या हालचाली सुरू आहेत', असा अहवाल अमेरिकी गुप्तचर संघटना 'सीआयए'चे मुख्यालय 'पेंटॅगॉन'ने प्रसिद्ध केला आहे. 'दीर्घकाळापासून मैत्रीचे संबंध असलेल्या देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करून चीन त्यांना स्वत:च्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे', असेही त्यात म्हटले आहे.

आफ्रिकेतील दिजबौतीमध्ये चीनने त्यांचा नौदलाचा तळ बांधला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी अमेरिकेचाही लष्करी तळ आहे. 'पेंटॅगॉन'ने त्यांचा वार्षिक अहवाल अमेरिकी कॉंग्रेसला सादर केला आहे. या 97 पानी अहवालात 2016 मधील चीनच्या लष्करी पावलांचा आढावा प्रामुख्याने घेण्यात आला आहे. 'पेंटॅगॉन'च्या अंदाजानुसार, चीनने गेल्या वर्षी संरक्षण क्षेत्रासाठी 180 अब्ज डॉलरची भरघोस तरतूद केली होती. ही तरतूद 140.4 अब्ज डॉलर असल्याचे चीनने अधिकृतरित्या सांगितले होते. 'नजीकच्या भविष्यात चीन पाकिस्तानसारख्या देशांमध्येही लष्करी तळ बांधण्याच्या दिशेने हालचाली करत आहे', असे या अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

दिजबौतीमधील चीनच्या अस्तित्वामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेमध्ये अस्तित्व निर्माण करत चीनने भारताला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून चीन पाकिस्तानला आर्थिक मदत करत आहेच; शिवाय पाकिस्तान चीनकडून शस्त्रास्त्रेही आयात करत आहे. गेल्या वर्षी चीनकडून पाकिस्तानने आठ पाणबुड्या घेण्याचा करारही केला. पाकिस्तानचा वापर लष्करी तळ म्हणून करण्याच्या दिशेने चीन प्रयत्न करत असल्याचा उल्लेख 'पेंटॅगॉन'च्या अहवालात असला, तरीही या कृतीला भारत कसे प्रत्युत्तर देणार, याविषयी त्यात भाष्य केलेले नाही.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या ताज्या बातम्या

हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण

शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण

परभणी: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून

Web Title: India China relations Pentagon Chinese military base Pakistan