भारताने आमची बदनामी करु नये: चीन

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

बीजिंग - भारताने चीनच्या भूमिकेचा चुकीचा अन्वयार्थ काढून चीनची बदनामी करु नये, असे मत या देशामधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे. 

बीजिंग - भारताने चीनच्या भूमिकेचा चुकीचा अन्वयार्थ काढून चीनची बदनामी करु नये, असे मत या देशामधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे. 

भारतास आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सदस्य म्हणून प्रवेश न मिळू देण्यामागे चीनने कळीची भूमिका बजावली होती. मात्र एनएसजीबरोबरच क्षेपणास्त्र तंत्रज्ञाण नियंत्रण करार व्यवस्थेचे (एमटीसीआर) सदस्यत्व भारतास मिळाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. चीनला मोठ्या राजनैतिक प्रयत्नानंतरही एमटीसीआरचे सदस्यत्व मिळविण्यात यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या माध्यमामधून गेल्या काही दिवसांपासून भारतास लक्ष्य करण्यात येत आहे. 

"चीनच्या भूमिकेचा चुकीचा अन्वयार्थ लावून चीनची बदनामी करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्‍वासार्हता मिळविण्यासाठी भारताने अधिक प्रयत्न करावयास हवे होते,‘‘ असा हल्ला ग्लोबल टाईम्समधील संपादकीयाच्या माध्यमामधून चढविण्यात आला आहे. ""एनएसजीच्या बैठकीचे फलित पचविण्यास भारतीय जनतेसही जड जात असल्याचे दिसून येत आहे. बहुसंख्य भारतीय माध्यमांनी चीन भारतविरोधी असून; चीनच्या या विरोधामागे पाकिस्तानला मदत करण्याचाच उद्देश असल्याची भूमिका घेत सर्व दोष एकट्या चीनलाच बहाल केला होता,‘‘ असे या संपादकीयामध्ये म्हटले आहे.

Web Title: India is defaming China, says state run daily