भारत हा जगद्‌गुरूच : दलाई लामा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 डिसेंबर 2016

दलाई लामांची स्तुतीसुमने 

पाटणा :  भारत नेहमीच जगाचा मार्गदर्शक आणि गुरू राहिला आहे. आमचे आणि भारताचे नाते हे गुरू-शिष्याचे आहे. महात्मा बुद्धांनी सांगितलेल्या जीवनसंदेशांना जगभर पोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी आज येथे केले. कालचक्र पूजेसाठी आलेल्या लामा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही भेट घेतली. नितीश यांनीही "बुद्ध स्मृती पार्क'मध्ये आयोजित पूजेमध्ये सहभाग घेतला.

या कालचक्र पूजेमध्ये सहभाग घेण्यासाठी देशविदेशातून शेकडो बौद्ध भिक्‍खू बिहारमध्ये आले आहेत. तत्पूर्वी 2012 मध्येही पूजा झाली होती. तेव्हाही दलाई लामा उपस्थित होते. एक बौद्ध भिक्‍खू म्हणून मला बोधगयेमध्ये येता आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. नितीश यांनी येथे बुद्ध स्मृती पार्क स्थापन करून मोठे काम केले आहे. जगभरातील सर्व विसंवाद दूर करायचे असतील, तर विविध धर्मीयांत संवादाचा पूल उभा राहणे गरजेचे आहे. आपला इतिहास आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून खूप काही शिकता येते. जगभरातील संशोधकांसाठी भारत ही प्रेरणादायी भूमी आहे, असेही त्यांनी सांगितले. 
 
Web Title: India jagadguru