पाकिस्तानात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना शिख भाविकांना भेटण्यास रोखले

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानात असलेल्या शिख भाविकांना भेटण्यास रोखले. 

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानात असलेल्या शिख भाविकांना भेटण्यास रोखले. 

India lodges protest

परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सांगितले, की जवळपास 1800 शिख भाविकांचा एक समूह 12 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या यात्रेवर गेला होता. यातील काही भाविकांना भेटण्यासाठी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेटण्यास पाकिस्तानने रोखले. पाकिस्तानने शिख भाविकांची भेट नाकारल्याने भारताकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Web Title: India lodges protest after Pakistan blocks consular access to Sikh pilgrims