भारत-म्यानमारमध्ये तीन करारांवर सह्या

यूएनआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

स्यू की यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी, स्यू की यांनी लोकशाहीसाठी केलेला संघर्ष आणि त्यांना यामध्ये मिळालेले यश जगाला प्रेरणा देणारे असून, त्या एक आदर्श नेत्या असल्याचे नमूद केले. 
 
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांच्यादरम्यान आज कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी तीन करारांवर सह्या केल्या. 

स्यू की यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी, स्यू की यांनी लोकशाहीसाठी केलेला संघर्ष आणि त्यांना यामध्ये मिळालेले यश जगाला प्रेरणा देणारे असून, त्या एक आदर्श नेत्या असल्याचे नमूद केले. 
 
दुसऱ्या बाजूला स्यू की यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत सांगितले, की म्यानमारची जनता आर्थिक आणि राजकीय घडामोडींच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीतून फायदा होण्याची आशा बाळगून आहे. मोदी आणि स्यू की या दोन्ही नेत्यांनी भारत आणि म्यानमारच्या सुरक्षा संबंधांवर प्रामुख्याने भर दिला. प्रदेशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी सहकार्य वाढविणे आणि एकत्रितपणे काम करण्याला दोन्ही देश प्राधान्य देतील, असे मोदींनी सांगितले. 

Web Title: india-myanmar sign three major deals