भारत-नेपाळ मैत्रीचा गुरखा जवान हे पाया - राष्ट्रपती मुखर्जी

यूएनआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

काठमांडू - भारतीय लष्करातील गुरखा जवान आणि माजी सैनिक हे नेपाळ आणि भारताच्या मैत्रीच्या पायाचे खांब आहेत. या जवानांचा भारत सरकारला अभिमान वाटतो, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पोखरा येथे गुरखा माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले. 
नेपाळ दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पोखरा विमानतळावर नेपाळचे परराष्ट्रमंत्री हितराज पांडे यांनी स्वागत केले. 
 
राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, 'गेल्या 200 वर्षांपासून शूर गुरखा धैर्याने आणि प्रामाणिकपणे भारताला सेवा देत आहेत. आज 32 हजार गुरखा जवान भारतीय लष्करात असून, सुमारे एक लाख 26 हजार माजी सैनिक आणि त्यांच्या नेपाळमधील वारसांना निवृत्तिवेतन मिळत आहे. नेपाळमधील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी भारत एक पाऊलही मागे हटणार नाही. त्यांच्यासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यासाठी दरवर्षी तीन हजार 100 कोटी नेपाळी रुपये दिले जात आहेत. चालू वर्षी "वन रॅंक वन पेन्शन' (ओआरओपी) अंतर्गत माजी सैनिकांना चार हजार कोटी नेपाळी रुपये दिले जातील. या आधी भारताने नेपाळमधील भूकंपग्रस्त माजी सैनिकांना सहा हजार 832 कोटी नेपाळी रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. गेल्या वर्षी विविध कल्याणकारी योजनांसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी नेपाळी रुपयांचे साह्य केले आहे.'' 

Web Title: India-Nepal friendship is the foundation of Gurkha soldiers