भारत, पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा नाही-मेहर्षी

पीटीआय
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे, गृहविभागाचे सचिव राजीव मेहर्षी यांनी स्पष्ट केले आहे.

‘सार्क‘ देशांच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. राजनाथसिंहांच्या या दौऱ्यादरम्यान राजनाथसिंह व पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी नसीर अली खान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार नाही. आज या परिषदेला सुरवात झाली असून, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी परिषदेचे उद्घाटन केले. 

दाऊद इब्राहिम आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया यासह काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्‍यता आहे. या परिषदेमध्ये संरक्षणविषयक अनेक मुद्‌द्‌यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. या परिषदेत राजनाथसिंह पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना होणारी मदत थांबवावी, असे ठणकावतील अशीही अपेक्षा आहे. 

Web Title: India Pakistan Discussion