भारत-पाकने मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेतः शरीफ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद: पाकिस्तान आणि भारत या शेजारी देशांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत आणि परस्परांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे टाळावे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केले.

इस्लामाबाद: पाकिस्तान आणि भारत या शेजारी देशांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत आणि परस्परांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे टाळावे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केले.

तुर्कस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की भारतविरोधी प्रचार करण्याची जुनी पद्धत आमच्या पक्षाने थांबविली आहे. दोन्ही देशांतील संबंध चांगले असावेत आणि दोन्ही देशांनी परस्परांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे उद्योग थांबवायला हवेत. आण्विक पुरवठादार देशांच्या गटातील समावेशासाठीच्या पाकिस्तानच्या दाव्याला तुर्कस्तानने पाठिंबा दिला असून, त्याबद्दल शरीफ यांनी तुर्कस्तानचे आभार मानले. या गटाचा सदस्य होण्यासाठी भारताकडूनही प्रयत्न सुरू आहेत. तसेच, काश्‍मीरप्रश्‍नी तुर्कस्तानकडून पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा मिळत असल्याचेही शरीफ यांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत.

Web Title: India-Pakistan nedd friendly relations: Sharif