भारत आणि सिंगापूरच्या नौदलाचा संयुक्त सराव

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल

नवी दिल्ली - भारत आणि सिंगापूरच्या नौदलाने गुरुवारी चीनच्या वाढत्या प्रभावक्षेत्राचा साक्षी असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात सात दिवस चालणारा संयुक्त सराव सुरू केला.

सिंगापूर-भारत समुद्री द्विपक्षीय सरावात भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका, तसेच लांब पल्ल्याचा मारा करणारे पाणबुडीविरोधी विमान पी 81 भाग घेत आहे. दोन्ही नौदलांमधील मोहीम वाढविण्याच्या हेतूने हा सराव घेतला जात आहे. या सरावादरम्यान समुद्रातील विविध मोहिमांतर्गत कारवायांची योजना आखण्यात आली आहे.

नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले, की या वर्षी समुद्रातील सरावादरम्यान पाणबुडीविरोधी युद्धकौशल्य, जमीन, आकाश तसेच जमिनीखालील दलांबरोबरच हवाई संरक्षण, तसेच जमिनीवरील चकमकींवर भर असेल. सिंगापूर नौदलाचे अनेक युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. त्याचबरोबर यामध्ये सिंगापूरचे समुद्री गस्त विमान फोकर एफ 50 आणि एफ 16 विमानही सहभागी होईल.

Web Title: India, Singapore practice joint naval exercise