''इम्रानच्या 'गुगली'पुढे भारताला झुकावेच लागले''

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

इस्लामाबाद : करतारपूरचा कार्यक्रम हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून टाकण्यात आलेली ही एक 'गुगली' होती. या गुगलीमुळे भारताने दोन मंत्र्यांना पाकिस्तानला पाठविले, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

करतारपूर कॉरिडोरचे भूमिपूजन कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी पार पडले. या कार्यक्रमाच्या काही तासानंतर शाह यांनी सांगितले, की ''करतारपूर कार्यक्रम इम्रान खान यांनी टाकलेली एक गुगली होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतासोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे. येथे यावे आणि आमच्याशी हातमिळवणी करावी. भारताचे प्रतिनिधी न्यूयॉर्कला भेटायला तयार होतात. मात्र, भारताचे राजकारण यामध्ये बाधा टाकत आहे''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''आपण आणि संपूर्ण जगाने पाहिले असेल की इम्रान खान यांनी करतापरपूरची गुगली फेकली. त्याचा परिणाम काय झाला हेही आपण पाहिले असेलच. यापूर्वी भारत भेटीसाठी घाबरत होता. मात्र, आता भारताला आपल्या दोन मंत्र्यांना पाठविण्यास भाग पाडले. त्यांचे मंत्री पाकिस्तानात आले''. 

Web Title: India starts bowing down before Imrans Googly