कोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेला भारताचा पाठिंबा; चीनला सूचक इशारा

कोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेला भारताचा पाठिंबा; चीनला सूचक इशारा

नवी दिल्ली : जगभरात उत्पात घडविणाऱ्या कोरोनावरून चीनबद्दल वाढलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाला भारताने जाहीर पाठिंबा दिला असून यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असा इशाराही चीनचे नाव न घेता दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात पसरला असून हा विषाणू नैसर्गिक नव्हे तर प्रयोगशाळेत तयार केला असल्याचाही आरोप होत आहे. विषाणूचा नेमका उगम कोठून झाला याची जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी करावी, या मागणीनेही जोर धरला आहे. (India support to the US to find the origin of the corona virus Indicative warning to China)

कोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेला भारताचा पाठिंबा; चीनला सूचक इशारा
'हे काय बरोबर नाही!' ममतांच्या वर्तनावर राजनाथ सिंह नाराज

याबाबतच्या प्राथमिक चौकशीमध्ये प्रयोगशाळेतील निर्मितीची अत्यल्प शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, या चौकशीला चीनकडून पारदर्शक सहकार्य मिळाले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर अमेरिकेने दुसऱ्या टप्प्यातील चौकशीची मागणी केली. तर जागतिक आरोग्य संघटनेनेही यासाठी होकार दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावर चीनला घेरण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुप्तहेर यंत्रणांना ९० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे. वुहानमधील प्रयोगशाळेतील अनेक संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, असे एका तपासात आढळून आल्यानंतर बायडेन यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत तपास करताना प्रयत्नांमध्ये दुपटीने वाढ करण्यास मी गुप्तचर विभागाला सांगितले असून ते निश्‍चित निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे बायडेन यांनी सांगितले. या तपासामध्ये चीनने संपूर्ण सहकार्य करावे आणि पारदर्शीपणे सर्व माहिती पुरवावी, यासाठी जगभरातील समविचारी देशांच्या मदतीने त्यांच्यावर दबाव आणणार असल्याचेही बायडेन यांनी सांगितले.

कोरोनाचा उगम शोधण्यासाठी अमेरिकेला भारताचा पाठिंबा; चीनला सूचक इशारा
बायडन यांच्या रडारवर चीन; गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांचा अल्टीमेटम

भारताने कोरोना उगमाच्या व्यापक चौकशीला खुला पाठिंबा देत सीमावादावरून कुरापती काढणाऱ्या चीनला सूचक इशाराही दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनातून आरोग्य संघटनेच्या अध्ययनाला भारताचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, चीनचे थेट नाव घेण्याचे टाळले. कोरोना विषाणूचे उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेले वैश्विक अध्ययन हे महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी तसेच तपशील मिळविण्यासाठी आणखी अध्ययनाची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर पुढील कार्यवाहीसाठी आणि या अध्ययनासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी चीनला या चौकशीसाठी सहकार्याचे आवाहन केले.

चीनकडून टीका
विषाणूच्या उगमाचा नव्याने शोध घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे राजकीय खेळी असून ते आपली जबाबदारी झटकत आहेत, अशी टीका चीनने केली आहे. अमेरिकेला वास्तवाशी आणि सत्याशी काहीही देणेघेणे नसून विषाणूच्या उगमाचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्यातही त्यांना रस नाही, त्यांना केवळ कुरघोडीचे राजकारण करायचे आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल केला आहे. चीनमध्ये तपासणी झाली आहे, आता अमेरिकेनेही त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये, विशेषत: लष्कराच्या फोर्ट डेट्रीक येथील प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन चीनने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com