भारत अमेरिकेचा जवळचा मित्र- डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

दूरध्वनीवरील चर्चेवेळी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली/वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, की भारत हा अमेरिकेसाठी जवळचा सहकारी आणि एक चांगला मित्र आहे. संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करत जागतिक दहशतवादाच्या विरोधातील लढाईमध्ये दोन्ही देश खांद्याला खांदा लावून लढतील, यावरही दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये एकमत झाले. दोन्ही नेत्यांनी परस्परांना आपल्या देशाला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे.

"व्हाइट हाउस'तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र असून, जागतिक आव्हानांच्या विरोधातील लढाईमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करतील यावर ट्रम्प यांनी भर दिला. चालू वर्षाच्या अखेरीस अमेरिकेला भेट देण्याचे आमंत्रण ट्रम्प यांनी मोदी यांना दिले असल्याचेही सांगण्यात आले. आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी या वेळी झालेल्या चर्चेत भर दिला. दहशतवादाच्या विरोधातील लढाईमध्ये दोन्ही देश खांद्याला खांदा लावून काम करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी "ट्‌विट'मध्ये म्हटले आहे, की "अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी काल रात्री संवाद झाला. या वेळी मी ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे.' भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प हे जगातील विविध देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत. त्यामध्ये मोदी हे पाचवे नेते आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडू, मेक्‍सिकोचे प्रमुख इनरीक पेना नीतो, इस्राईली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आदी नेत्यांशी ट्रम्प यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Web Title: India-US close friend- Donald Trump