esakal | 'टाइम'च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा 
sakal

बोलून बातमी शोधा

'टाइम'च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा 

'टाइम'च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा 

sakal_logo
By
पीटीआय

ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे. दिव्या नाग, डॉ. राज पंजाबी आणि अतुल गावंडे अशी या तिघांची नावे आहेत. 

'टाइम' या नियतकालिकाचे आरोग्य संपादक आणि वार्ताहरांनी तब्बल महिनाभर अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या नावांची शिफारस केली होती, यासाठी या तिघांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील चार विविध श्रेणींमध्ये या तिघांनीही केलेल्या कामकाजाची दखल घेण्यात आली असून, यामध्ये जनआरोग्य, उपचार, किंमत आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. या प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असून, या सर्वांचे आरोग्यक्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. 

नवे शिलेदार 
दिव्या नाग (वय 30) या 'अॅपल'च्या आरोग्य सेवेसंदर्भातील विशेष प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने तयार केलेले 'रिसर्चकीट' हे ओपन सोर्स ऍप डेव्हलपर डॉक्‍टर आणि संशोधकांसाठी लाभदायी असून, या मध्यमातून रुग्ण, तसेच वैद्यकीय माहितीचे शेअरिंग सहज शक्‍य आहे. याचा समावेश "ऍपल वॉच'मध्ये करण्यात आला आहे. अतुल गावंडे हे आरोग्य क्षेत्रातील मोठ्या भागिदारीचे नेतृत्व करतात, ना नफा-ना तोटा या तत्त्वावर ही सुरू असून, याचा लाभ अमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जे. पी. मॉर्गन या कंपन्यांमधील दहा लाख कर्मचाऱ्यांना होतो. राज पंजाबी यांनी दुर्गम भागांत आरोग्य सुविधा पोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 

loading image