भारताने इतिहासापासून शिकावे: चीनचा गर्भित इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चेचा पर्याय खुला आहे. मात्र भारतीय लष्कराने त्वरित भारतीय भूभागामध्ये परतावे. राजनैतिक चर्चा होण्यासाठी ही अट आहे

बीजिंग - भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादासंदर्भात अर्थपूर्ण राजनैतिक चर्चा करावयाची असल्यास आधी भारताने सिक्कीम सेक्‍टरमधील दोंग लॉंग भागामधील लष्कर मागे घ्यावे, अशी मागणी चीनकडून करण्यात आली आहे. याचबरोबर, 1962 च्या युद्धाचा थेट उल्लेख न करता चीनने भारताने "इतिहासापासून शिकावे,' असा गर्भित इशाराही यावेळी दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालय्याचे प्रवक्ते लु कांग यांनी यावेळी दोंग लॉंग भागामध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या "घुसखोरी'चे छायाचित्रही प्रसिद्ध केले.

"दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चेचा पर्याय खुला आहे. मात्र भारतीय लष्कराने त्वरित भारतीय भूभागामध्ये परतावे. राजनैतिक चर्चा होण्यासाठी ही अट आहे,'' असे लू म्हणाले. याचबरोबर, चिनी सैन्य दोंग लॉंग भागात घुसल्यासंदर्भातील भूतानच्या भूमिकेवर कांग यांनी कानांवर हात ठेवले. चिनी सैन्य हे चीनच्या हद्दीमध्येच असल्याचा दावा त्यांनी केला.

सिक्‍कीम भागामधील भारतीय लष्कराचा जुना बंकर चिनी सैन्याने बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केला आहे. हा बंकर हटविण्यासंदर्भात चीनकडून करण्यात आलेली विनंती भारताकडून फेटाळण्यात आल्यानंतर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सिक्‍कीममधील दोका ला येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर भारताकडूनच चिनी हद्दीमधील काम रोखण्यात आल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता.

भारतीय लष्कराकडून सिक्कीम भागामधील जुन्या बंकर्सच्या डागडुजीसहित येथे अधिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लष्कराच्या या कार्यामुळे चीन संतप्त झाल्याचे मानले जात आहे. भारत व चीनमध्ये एकूण 3,488 किमी लांबीची सीमारेषा असून त्यामधील 220 किमी लांबीची सीमारेषा सिक्कीम भागामध्ये येते. याआधी, सिक्कीम येथे नोव्हेंबर 2008 मध्ये चीनकडून घुसखोरी करण्यात आली होती. यावेळीही भारतीय लष्कराचे काही बंकर्स चीनकडून उध्वस्त करण्यात आले होते.

"सीमावादामध्ये चीनच्या विरोधात उभे राहणे भारताला परवडणारे नाही. सीमावादाचा भडका उडू देणे चीनने आत्तापर्यंत टाळले आहे. यावेळी मात्र भारताला नियम शिकविणे आवश्‍यक आहे,'' असा इशारा ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधील एका लेखाच्या माध्यमाधून देण्यात आला आहे.

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश दौराभारताशी अमेरिकेशी वाढणारी जवळिकअफगाणिस्तानमध्ये भारताचा वाढणारा प्रभाव, अशा इतर कारणांमुळे चीनकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून या विषयांसंदर्भात वेळोवेळी भारतावर टीका करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता भारताच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Indian Army should learn from 'historical lessons': China