भारतीय शहरांचा उष्मा"घात' अटळ

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

लंडन: सौरप्रकोपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, याचा मोठा फटका अन्य देशांप्रमाणेच भारतीय शहरांनादेखील बसणार आहे. कोलकत्यासारख्या ग्लोबल मेगासिटीज सूर्याच्या ज्वाळांमध्ये अक्षरश: होरपळून निघतील.

लंडन: सौरप्रकोपाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, याचा मोठा फटका अन्य देशांप्रमाणेच भारतीय शहरांनादेखील बसणार आहे. कोलकत्यासारख्या ग्लोबल मेगासिटीज सूर्याच्या ज्वाळांमध्ये अक्षरश: होरपळून निघतील.

"पॅरिस करारा'न्वये निर्धारित करण्यात आलेल्या पातळीवर जरी ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यात आले तरीसुद्धा उष्णतेची तीव्रता कमी होणार नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे. पॅरिस कराराला पाठिंबा देणाऱ्या देशांनी वैश्‍विक तापमानाची पातळी औद्योगिकीकरणापूर्वी जेवढी होती, त्यापेक्षा 2 अंश सेल्सिअसनी कमी करण्याचा निर्धार केला आहे. ही पातळी गाठण्यात जरी यश आले तरीसुद्धा उष्णतेचा त्रास काही केल्या कमी होणार नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे.

जगभरातील 101 पैकी 44 शहरांचा विचार केला तर त्यांच्यावरील उष्णतेचा मारा वाढल्याचे दिसून येते, लोकसंख्या वाढीचा दर अपेक्षेप्रमाणे राहिल्यास 2050 पर्यंत 35 कोटींपेक्षाही अधिक लोकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतील, असेही संशोधकांनी म्हटले आहे. वातावरण जसजसे दमट होऊ लागते, तसतशी उष्णतेची तीव्रतादेखील अधिक वाढते, असे ब्रिटनमधील लिव्हरपूल जॉन मुरेस विद्यापीठातील संशोधक टॉम मॅथ्यूज यांनी स्पष्ट केले. उदाहरणादाखल 2015 चा विचार केला तर पाकिस्तानात बाराशे लोकांचा मृत्यू झाला असून, भारतामध्ये दोन हजार लोक मरण पावले होते.

Web Title: indian city and temperature