खळबळजनक! भारताच्या ब्राँज पदक विजेत्यानं पत्नीसह आईचा केला खून

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला ब्राँझ पदक मिळवून देणाऱ्या अॅथलिटने आई आणि पत्नीचा खून केल्यानं खळबळ उडाली आहे. 

वॉशिंग्टन - आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला ब्राँझ पदक मिळवून देणाऱ्या अॅथलिटने आई आणि पत्नीचा खून केल्यानं खळबळ उडाली आहे. भारताचा माजी गोळाफेकपटू इक्बाल सिंह (iqbal singh) यांच्याविरोधात अमेरिकेत खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वत:च्या पत्नीचा आणि आईचा खून केल्याचे त्यांनी चार दिवसांपूर्वी स्वत:हून पोलिसांना कळवून आपल्या कृत्याची कबुली दिली होती. पेनसिल्वानियामधील त्यांच्या घरी पोलिस पोहोचल्यावर त्यांना रक्ताने माखलेले इक्बाल सिंग आणि आतल्या खोलीत दोन महिलांचे मृतदेह पडलेले आढळले. इक्बाल सिंह हे सध्या तुरुंगात असून त्यांच्या गुन्ह्याचे स्वरुप पाहून त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. या खूनामागील उद्देश अद्याप इक्बाल यांनी सांगितलेला नाही. 

पोलिसांना पहिल्या मजल्यावर इक्बाल यांची आई नसीब कौर यांचा मृतदेह आढळला. त्यांचा गळा कापण्यात आला होता. तर जिन्यावर पत्नी जसपाल कौर यांचा मृतदेह होता. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. इकबाल आणि त्यांच्या मुलाचं बोलणं झालं होतं. त्यांनी मुलाला आपण आई आणि पत्नीचा खून केला असल्याचं सांगितलं होतं. त्यांची दोन्ही मुलं त्यावेळी एकत्र होती आणि मुलीलाही इक्बाल यांनी हेच सांगितलं होतं. 

हे वाचा - धक्कादायक! चीनने ट्रायल न घेताच महिनाभर आधी दिली लस

कुवेतमध्ये १९८३ मध्ये झालेल्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत इक्बाल सिंह यांनी गोळाफेकीत ब्राँझ पदक जिंकले होते. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. येथे ते टॅक्सीचालकाचे काम करत होते. त्यांनी रविवारी आपल्या पत्नी आणि आईचा खून केल्यावर अत्यंत थंडपणे स्वत:च्या मुलाला फोन केला आणि ‘मी त्या दोघींना मारुन टाकले आहे, पोलिसांना फोन कर आणि मला पकडून घेऊन जायला सांग,’ असा निरोप दिला. इक्बाल सिंग हे त्यांच्या परिसरात प्रसिद्ध होते. 

न्यायालयाने जामीन फेटाळला
इकबाल सिंह यांना सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर खून प्रकरणी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं होतं. न्यायालयाने त्यांच्यावरील गंभीर आरोप पाहता जामीन फेटाळला. त्यांनी वकीलही दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. इक्बाल यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं की, ते हमीच न्यू टाउनशिपमध्ये फिरताना आणि मेडिटेशन करताना दिसत असत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian ex athlete iqbal singh arrested for murder of wife and mother