भारतीय भूखंड वेगानं सरकतोय; अफ्रिका, अटलांटिकापासून जातोय दूर

सम्राट कदम
Sunday, 9 August 2020

जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या "जिओलॉजी'या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेतील ऑक्‍सफर्ड विद्यापीठ आणि इंग्लंडच्या अल्फ्रेड वॅग्नर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी यासंबंधी संशोधन केले आहे. भारत-आफ्रिका, भारत-अटलांटिक, आफ्रिका-दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका- अटलांटिक आणि मालवियन्स भूखंडांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला.

पुणे : पृथ्वीवरील इतर भूखंडांच्या तुलनेत भारतीय भूखंड सर्वात वेगाने उत्तरेकडे सरकत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तसेच, सर्व भूखंडांच्या सरकण्याचा वेग सारखाच असतो आणि भारतीय भूखंड सरकण्यासाठी लाव्हा उद्रेकातून निर्मीत महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कारणीभूत असल्याची आजवरची धारणा नव्या संशोधनाने मोडीत निघाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक कराNo photo description available.

जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या "जिओलॉजी'या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेतील ऑक्‍सफर्ड विद्यापीठ आणि इंग्लंडच्या अल्फ्रेड वॅग्नर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी यासंबंधी संशोधन केले आहे. भारत-आफ्रिका, भारत-अटलांटिक, आफ्रिका-दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका- अटलांटिक आणि मालवियन्स भूखंडांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. कोट्यावधी वर्षांपासून अतिशय कूर्मगतीने हे सगळे भूखंड सरकत आहे. विशेष करून भारतीय भूखंडाच्या सरकण्याबद्दल सर्वच भूशास्त्रज्ञांना आकर्षण आहे. नव्या संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडला आहे. 

नवे बदल :
- भारतीय भूखंड सरकण्यासाठी दख्खनच्या पठाराची निर्मिती कारणीभूत नाही 
- इतरांच्या तुलनेत भारतीय भूखंडाचा सरकण्याचा दर सर्वाधिक 
- भारत-आफ्रिका, भारत-अटलांटिक या भूखंडातील दरी वाढली तर आफ्रिका-अमेरिका, अमेरिका-अटलांटिका या भूखंडांतील दरी कमी होत आहे. 
- मालवियन्स भूखंड मोठा होत आहे. 

आठ दिवसांनी दिसतात कोरोनाची लक्षणे; नव्या संशोधनातून समोर आली माहित

भूखंडातील तफावतीचा दर: 
1) भारत - आफ्रिका: 4.2 ते 9.2 सेंटीमीटर प्रती वर्ष (119 टक्के) 
ृ2) भारत - अटलांटिक: 7.06 ते 12.59 सेंटिमीटर प्रति वर्ष (78 टक्के) 
3) आफ्रिका - दक्षिण अमेरिका: 1.2 ते 2.04 सेंटिमीटर प्रति वर्ष (60 टक्के) 
4) आफ्रिका - अटलांटिक: 1 ते 1.48 सेंटिमीटर प्रति वर्ष (35 टक्के) 
5) दक्षिण अमेरिका - अटलांटिक: 1.14 ते 1.75 सेंटिमीटर प्रति वर्ष (54 टक्के) 

सर्वच भूखंडांच्या सरकण्याचा दर सारखाच असल्याचे गृहितक या संशोधनामुळे मोडीत निघाले आहे. भारतीय भूखंड जरी तुलनेने वेगाने सरकत असला तरी त्याचा जिवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, भूशास्त्रज्ञांना पृथ्वीबद्दल अधिकच्या संशोधनासाठी याचा उपयोग निश्‍चित होईल. 
- डॉ. श्रीकांत कार्लेकर, भूशास्त्रज्ञ 

लय भारी, पुण्यातील या 11 शिक्षकांनी मिळवली आयआयटीची पदवी

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian land is moving relatively fast and Atlantic Africa is going away