भारतीय नागरिकाची कॅनडात गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जुलै 2018

टोरंटोः कॅनडामधील ब्राम्पटॉन शहरामध्ये एका सत्तावीस वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलविंदरसिंग नावाची व्यक्ती 2009 मध्ये कॅनडामध्ये स्थायिक झाली होती. ट्रक चालविण्याचे ते काम करत होते. ते घरातच असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर वाढदिवसानंतर श्रद्धांजली वाहण्याची वेळ मित्रांवर आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Man Shot Dead At Canada