भारतीय चित्रपट पुन्हा पाकिस्तानात सुरू होणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानने चार महिन्यांनंतर आता भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविली आहे. ही बंदी उठविल्यामुळे रईस आणि काबिल या दोन चित्रपटांचे प्रदर्शन आता पाकिस्तानात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर पाकिस्तानने बॉलिवूडच्या चित्रपटांवर बंदी घातली होती.

पाकिस्तानने उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर आणि भारताने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या लक्षवेधी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राइक) भारतीय निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांतून पाकिस्तानच्या कलाकारांना काम करण्यास बंदी केली होती. या बंदीमुळे पाकिस्तानी चित्रपटगृहाचे मालक आपला तोटा स्थानिक चिटपटांच्या माध्यमातून भरून काढू शकत नव्हते. भारतीय चित्रपट येथे पुन्हा सुरू करण्याबाबत पाकिस्तानच्या चित्रपटगृह मालकांनी येथे लॉबिंग सुरू केले होते. गेल्या आठवड्यात याबाबत विचार करण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एका समितीची स्थापना केली होती.
माहिती मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीमंत्री मरयम औरंगजेब आणि पंतप्रधान शरीफ यांचे सल्लागार इरफान सिद्दीकी यांनी भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविण्याची शिफारस केली आहे. भारतीय चित्रपटांवरील बंदी उठवून त्यांच्या प्रदर्शनास परवानगी देण्याची शिफारस समितीने सरकारला केली आहे, असे या सूत्राने सांगितले.

Web Title: Indian movie will begin again in Pakistan