भारतीय प्रसारमाध्यमांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय; चीनमध्ये...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

भारत सरकारने 59 ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात मोठी चकमक झाली होती. या चकमकीबाबतची प्रत्येक घडामोडीची माहिती भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात होती. तसेच त्यानंतर आता चीन सरकारकडून याबाबतच नवा प्लॅन आखला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनने आता भारतीय प्रसारमाध्यम आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत-चीन या दोन्ही देशात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन सरकारने मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स आणि वृतपत्रांमधील माहिती भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर लगाम कसा लावता येईल, याकडे सध्या चीन सरकारचे लक्ष आहे. त्यानुसारच भारतीय प्रसारमाध्यमे आणि भारतीय वेबसाईट्सना चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

Can Indian newspapers

चीनच्या 59 ऍपवर बंदी

भारत सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेल्या ऍपमध्ये टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातली. 

आयपी टीव्हीच्या माध्यमातून शक्य

आयपी टीव्ही हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम बनले आहे. भारतीय टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी आयपी टीव्हीचा वापर महत्त्वाचा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून डेस्कटॉप आणि आयफोनवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही. परिणामी टीव्ही चॅनेल्स पाहता येत नाहीत.

व्हीपीएनमुळे पाहता येतात वेबसाईट्स

चीन देशातील नागरिक फक्त व्हीपीएनच्या मदतीने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. परंतु चीन सरकारने त्यांच्याकडे असणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर हे ब्लॉक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या चीनमध्ये अद्ययावत असे फायरवॉल उपलब्ध आहे. त्यामुळे या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केले जाऊ शकते.

10 हजार वेबसाईट्स ब्लॉक

चीनकडून जवळपास 10 हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही सोशल नेटवर्किंग साइट्चाही समावेश आहे.  व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासह ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे, अशी माहिती साऊथ चीन मॉर्निंग पोस्टने दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian newspapers websites not accessible in China