सिगारेट देण्यास नकार दिल्याने भारतीयाची हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

लंडन - भारतीय वंशाचे दुकानदार विजय पटेल(49) यांची किशोरवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना घडली. पटेल यांनी 18 वर्षाखालील मुलांना सिगारेट विकत देण्यास नकार दिल्याने या मुलांनी त्यांना मारले. 

लंडनमध्ये किशोरवयीन मुलांना मादक पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यामुळे एका मुलाने पटेल यांच्याकडे सिगारेटची मागणी केल्यावर त्यांनी या मुलाकडे ओळखपत्राची मागणी केली. त्याने ओळखपत्र दाखविण्यास साफ नकार दिला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलवून पटेल यांना बेदम मारहाण केली. 

'लंडन अँबुलन्स सर्विस'ला पटेल हे त्यांच्या दुकानाजवळील रस्त्यावर पडलेले सापडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन मुलांना अटक करण्यात आली आहे. पटेल यांच्या डोक्यावर आणि छातीवर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पटेल यांच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले.

2006मध्ये पटेल आपल्या परिवारासह लंडनमध्ये स्थायिक झाले. त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी विभा पटेल भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian-Origin Man Refused To Sell Cigarettes To UK Teens, Beaten To Death