खासगी विमानाने फ्रान्सला पाठवले खाद्यपदार्थ

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

भारतीय मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. हे मसाले वापरुन केलेले पदार्थही जगभरात आवडीने खाल्ले जातात. एका ब्रिटिश नागरिकालाही भारतीय पदार्थांची चव एवढी आवडली की त्याच्या मागणीखातर युकेमधल्या आकाश रेस्टॉरंटने हॅम्पशायरवरून फ्रान्समध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी पाठवली.

विशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ खासगी विमानाने फ्रान्समध्ये पाठवण्यात आले.

आकाश रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या नागरिकाने मागवलेल्या 10 प्रकरच्या कैरीपासून तयार केलेल्या चटण्या, 75 भातांचे प्रकार, आणि 70 वेगवेगळे भारतीय पद्धतीचे जेवणाचे प्रकार या विमानाने पाठविण्यात आले. 

फ्रान्समध्ये मिळणारे भारतीय पद्धतीचे जेवण मला अजिबात आवडले नाहीत, म्हणून मी हॅम्पशायरवरून जेवण मागवल्याचे त्या ग्राहकाने स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Web Title: Indian Restaurant Delivers Curry To France In Private Plane