अमेरिकेच्या न्याय विभागात भारतीय वंशाची महिला?

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

वकील हरमित धिल्लन यांच्या निवडीची शक्‍यता

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या नागरी हक्क विभागात भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील हरमित धिल्लन (वय 48) यांची निवड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तीन नागरिकांवर गेल्या दोन आठवड्यांत वंशद्वेषातून हल्ले झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर धिल्लन यांची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हरमित धिल्लन यांचा जन्म चंडिगडचा असून, सध्या त्या कॅलिफोर्नियातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या आहेत. ऍटर्नी जनरल जेफ सेसिऑन्स यांनी गेल्या आठवड्यात त्यांची मुलाखत घेतली होती, असे वृत्त "वॉल स्ट्रिट जर्नल'ने गुरुवारी (ता. 9) दिले आहे. क्‍लिव्हलॅंड येथे जुलै महिन्यात झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन त्यांनी शीख धर्मीयांच्या प्रार्थनेने केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर हरमित धिल्लन यांच्या निवडीला पाठिंबा दिला, तर न्याय विभागात या पदावर असलेल्या भारतीय वंशाच्या विनिता गुप्ता यांच्या जागी त्यांची निवड होईल. गुप्ता यांची निवड माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती.
भारतीय वंशाच्या तीन अमेरिकन नागरिकांवर वंशद्वेषातून हल्ले झाले आहेत. याच काळात हरमित धिल्लन यांची नियुक्ती न्याय मंत्रालयातील नागरी हक्क विभागातील सदस्यपदी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर त्यांची निवड झाली तर जात-धर्म, वर्ण, लिंगभेद, शारीरिक अपंगत्व, कौटुंबिक परिस्थिती व राष्ट्रीयत्व या कारणांवरून भेदभाव होऊ नये, यासाठी त्या सांघिक कायदा अमलात आणू शकतात.

वंशद्वेषातून गमावले पतीला
धिल्लन यांनी वंशद्वेष व भेदभावाचे चटके सहन केले आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती डॉक्‍टर होते. 1995 मध्ये एका माथेफिरूने त्यांची न्यूयॉर्कमध्ये चालत्या बसमध्ये हत्या केली. त्या वेळी "तू हिंदू, माझ्या मार्गातून चालता हो', असे त्यांना उद्देशून तो म्हणाला होता, अशी माहिती एका दैनिकाने दिली आहे. त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. रिपब्लिकन पक्षातील प्रमुखपदाच्या 2013 मधील निवडणुकीत सहकाऱ्याने त्यांना उद्देशून "मुस्लिम दहशतवादाच्या पाठिराख्या' व "ताज महालची राजकन्या' असे विधान केले होते.

Web Title: Indian tribe women United States Department of Justice?