श्रीलंकेत भारतीय क्रिकेटपटूचा बुडून मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

या क्रिकेटपटूला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रंगामा टिचिंग रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. गुजरातमधील हा संघ असून, या संघात 19 सदस्य सहभागी होते. 

कोलंबो - श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी गेलेल्या 17 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातील एका क्रिकेटपटूचा जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मंगळवारी ही घटना घडली असून, 17 वर्षांखालील भारतीय संघाचा तो सदस्य होता. तो मुळचा गुजरात आहे. त्याचे 12 वर्षे असून, तो आइसलँडकडूनही खेळला होता. कोलंबोतील पामुगामा हॉटेलमधील जलतरण तलावात चार भारतीय क्रिकेटपटू पोहत असताना ही घटना घडली. पामुगामा पोलिस अधिक तपास करत आहेत.

या क्रिकेटपटूला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रंगामा टिचिंग रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. गुजरातमधील हा संघ असून, या संघात 19 सदस्य सहभागी होते. 

Web Title: Indian U-17 cricketer dies in Sri Lanka