बंदूकीच्या धाकाने पाक व्यक्तीशी विवाह; भारतीय महिला

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

इस्लामाबादः पाकिस्तानी व्यक्तीने बंदूकीचा धाक दाखवून विवाह करण्यास भाग पाडले, असे भारतीय महिलेने सांगितल्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला होता. शिवाय, त्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. परंतु, उझमा या भारतीय महिलेने ताहीर अली या पाकिस्तानी नागरिकाच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे.

उझमा हिने इस्लामाबाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, 'ताहीरने आपल्याला बंदूकीचा धाक दाखवून विवाह केला. यावेळी त्याने माझ्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतली होती. विवाहानंतर मोठ्या प्रमाणात त्रासही दिला आहे. मला त्याच्यासोबत रहायचे नसून, भारतामध्ये सुखरूप जायचे आहे.'

भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात ताहीर उझमाला आज (सोमवार) सकाळी भेटला होता. परंतु, तो न्यायालयात हजर राहिला नाही.

दरम्यान, नवी दिल्लीतील उझमा व ताहीर यांची मलेशियात भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर उझमा 1 मे रोजी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली आणि तेथे 3 मे रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला होता. ताहीर आपल्या व्हिसासाठी पत्नीसह येथील उच्च आयोगाच्या कार्यालयात गेला होता. तेथे त्याने त्याबाबतचा अर्ज सादर केला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्यांकडील मोबाईल फोन काढून घेतले होते. नंतर अधिकाऱ्यांनी उझमा हिला आत बोलावून घेतले; मात्र काही तास लोटले तरी, ती बाहेर न आल्याने ताहीरने याची चौकशी केली. तेव्हा उझमा येथे नसल्याचे त्याला सांगण्यात आले. काढून घेतलेले फोन परत करण्यासही अधिकाऱ्यांनी नकार दिला, असे ताहीरने म्हटले होते.

Web Title: Indian woman says was forced to marry Pak man on gunpoint