Photo : मिस वर्ल्ड जमैकाची; चर्चा मात्र भारताच्या सुमन रावचीच

टीम ई-सकाळ
Sunday, 15 December 2019

सूमनचं महाराष्ट्र कनेक्शन काय? - सूमन मूळची राजस्थानची असली तरी तिचं शिक्षण नवी मुंबईत महात्मा स्कूल ऑफ अकॅडमिक्स अँड स्पोर्ट्स इथं झालंय. 

लंडन : लंडनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या रंगारंग सोहळ्यात 2019च्या मिस वर्ल्डची (Miss World)घोषणा झाली. जमैकाची टोनी सिंह मिस वर्ल्ड झाली. भारताच्या सुमन रावला सेकंट रनर अप म्हणून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण, या सोहळ्यात चर्चा सुमन रावचीच झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Image may contain: 1 person, shoes

Image may contain: 2 people, people smiling, people standing

काय आहे सूमनची पार्श्वभूमी?
सुमन रावनं या सोहळ्यात भारतीय पेहरावात एक नृत्य सादर केलं होतं. त्याला उपस्थितांकडू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूमन मुळची राजस्थानमधील उदयपूरजवळची आहे. ऐदाना हे तिचं मूळ गाव. यावर्षी तिनं फेमिना मिस राजस्थानचा किताब पटकावला. त्यानंतर ती फेमिना मिस इंडिया झाली. मिस एशिया 2019 स्पर्धेत आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यात मिस एशियाचा किताब मिळवण्यात ती यशस्वी झाली. पण, मिस वर्ल्डमध्ये ती तिसऱ्या स्थानावर राहिली. 

आणखी वाचा - टोनी सिंह बनली यंदाची मिस वर्ल्ड 

Image may contain: 1 person, smiling, standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing

सूमनचं महाराष्ट्र कनेक्शन काय? 
सूमन मूळची राजस्थानची असली तरी तिचं शिक्षण नवी मुंबईत महात्मा स्कूल ऑफ अकॅडमिक्स अँड स्पोर्ट्स इथं झालंय. ती एक वर्षांची असतानाच तिचं कुटुंब मुंबईला शिफ्ट झालं. त्यामुळं तिची जडमघडण मुंबईत झाली आहे. ती कथक नृत्यांगणा आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, shoes and indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india's suman rao was on limelight in miss world contest at london