इंडोनेशियात भूकंप; मृतांचा आकडा 830 वर

Indonesia earthquake and tsunami death toll surpasses 830
Indonesia earthquake and tsunami death toll surpasses 830

इंडोनेशिया- इंडोनेशियातील भूकंपाची परिस्थिती भीषण असून, मृतांचा आकडा 830 वर पोहोचला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियातील सुलासेवी बेटाला 7.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. याठिकाणी त्सुनामी आली असून त्यामुळे या भागातील 830 जणांचा मृत्यू झाला आहे.

या बेटावर 10 फूट उंचीच्या लाटा आल्या. या लाटांचा जोर इतका जास्त होता की त्यामुळे पाणी इमारतींमध्ये शिरले. याठिकाणी असलेल्या पालू या प्रांतातील लोकांना या त्सुनामीचा मोठा फटका बसला असून अनेकांची घरे यामध्ये उध्वस्त झाली आहेत. त्सुनामीचा जोर इतका जास्त होता की त्यामध्ये अनेक घरे वाहून गेली आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. पालू भागातील लोकांच्या मदतीसाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून सैन्यदल आणि इतर यंत्रणा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या भूकंपाचा सुमारे साडे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. या भूकंपानंतर लोकांना आपली घरे सोडून रस्त्यावर यावे लागले आहे. लोक भीतीने घाबरून घरे सोडून पलायन करत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com