इंडोनेशियात कोसळलेल्या विमानाचा वैमानिक भारतीय

वृत्तसंस्था
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

या विमानाचा एक वैमानिक भारतीय होता. भव्य सुनेजा असे या वैमानिकाचे नाव होते. त्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. भव्य हा दिल्लीतील मयूर विहार येथील रहिवाशी आहे. तो 2011 मध्ये लायन एअरवेजमध्ये वैमानिक म्हणून नोकरीस रुजू झाला होता. भव्यला 2009 मध्ये वैमानिकाचा परवाना मिळाला होता.

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक हा भारतीय होता आणि त्याचाही मृत्यू झालेल्यां 188 जणांमध्ये समावेश आहे.

लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग येथे उड्डाण घेतले. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर 13 व्या मिनिटालाच विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळाने सुमात्रा बेटांजवळ समुद्रात ते कोसळल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. या दुर्घटनेत 178 प्रवासी, 3 मुले आणि दौन वैमानिकांसह 7 जण असे 188 जणांचा मृत्यू झाला.

या विमानाचा एक वैमानिक भारतीय होता. भव्य सुनेजा असे या वैमानिकाचे नाव होते. त्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. भव्य हा दिल्लीतील मयूर विहार येथील रहिवाशी आहे. तो 2011 मध्ये लायन एअरवेजमध्ये वैमानिक म्हणून नोकरीस रुजू झाला होता. भव्यला 2009 मध्ये वैमानिकाचा परवाना मिळाला होता. लायन एअरवेज ही इंडोनेशियाची सर्वांत नवी एअरवेज कंपनी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indonesia plane crash delhi based Bhavya Suneja was flying the lion airplane