इंडोनेशियात विमान कोसळल्याने 13 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

25 कोटींपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये गेल्या काही वर्षांत दळणवळणाच्या तीनही प्रकारांमध्ये (जमीन, जल व हवाई वाहतूक) मोठे अपघात झाले असून त्यांमध्ये मोठी जीवितहानीही झाली आहे. याचबरोबर, इंडोनेशियाच्या सैन्यासही विविध अपघातांचा फटका बसला आहे

जकार्ता - इंडोनेशियाच्या लष्कराचे "हर्क्‍युलस सी-130' हे मालवाहु विमान आज (रविवार) कोसळल्याने विमानामधील सर्व 13 जण मृत्युमुखी पडले. पूर्व इंडोनेशियामधील पापुआ प्रांतामध्ये हा अपघात झाला.

इंडोनेशियातील तिमिलिका या शहरामधून उड्डाण केलेले हे विमान वामेना येथे सुमारे 12 टन अन्न व सिमेंट घेऊन जात होते. परंतु जमिनीवर उतरण्याआधी काहीच मिनिटे हे विमान कोसळल्याची माहिती इंडोनेशियाचे हवाई दल प्रमुख अगुस सुप्रिआत्ना यांनी दिली. येथील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. मात्र विमानामधील कोणीही वाचू शकले नाही. इंडोनेशियात गेल्या महिन्याभराच्या काळात झालेला हा तिसरा गंभीर विमान अपघात आहे.

25 कोटींपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये गेल्या काही वर्षांत दळणवळणाच्या तीनही प्रकारांमध्ये (जमीन, जल व हवाई वाहतूक) मोठे अपघात झाले असून त्यांमध्ये मोठी जीवितहानीही झाली आहे. याचबरोबर, इंडोनेशियाच्या सैन्यासही विविध अपघातांचा फटका बसला आहे.

Web Title: Indonesian military plane crashes in Papua

टॅग्स