‘एचआयव्ही’च्या विषाणूंचा पेशींना संसर्ग

‘एचआयव्ही’च्या विषाणूंचा पेशींना संसर्ग

वॉशिंग्टन - ‘ह्युमन इम्युनोडिफिशिएन्सी व्हायरस’ अर्थात ‘एचआयव्ही’च्या विषाणूवर सध्या जगभर संशोधन सुरू आहे. यात आता संशोधकांनी आणखी पुढचा टप्पा गाठत या उतींचा त्रिमितीय स्थितीत कशा पद्धतीने प्रसार होतो, याचा मागोवा घेतला आहे. 

सर्वसाधारणपणे या विषाणूची चाचणी टेस्ट ट्यूबमध्ये घेतली जाते. पण, ही पद्धत द्विमितीय असते. या विषाणूच्या प्रभावामुळे मानवी शरीरामध्ये काही क्‍लिष्ट बदल होतात. पण, ते सर्वसाधारणपणे लवकर लक्षात येत नाहीत. आता संशोधकांनी सुधारित पेशी अभ्यास प्रणालीचा वापर करून या बदलांचा वेध घेतला आहे. यामध्ये प्रतिमांचा तुलनात्मक अभ्यास आणि संगणकीय आराखड्याचे अवलोकन यांचा समावेश होता. यातून उतींच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या विषाणूचा एका पेशीकडून दुसऱ्या पेशीला संसर्ग होत असल्याचे दिसून आले.

संशोधकांनी यासाठी तीस वर्षे संशोधन केले होते. एड्‌सच्या विषाणूंचे नेमके कोणत्या माध्यमातून वहन होते, हे मात्र स्पष्ट झालेले नाही; तसेच विशिष्ट वातावरणामध्ये या विषाणूचा मानवाला कशा पद्धतीने संसर्ग होतो, याचे कोडेही संशोधकांना उलगडलेले नाही. सर्वसाधारणपणे ‘एचआयव्ही’च्या विषाणूवर प्रयोगशाळेत सामान्य पेशी वातावरणात प्रयोग केले जातात. यासाठी प्लॅस्टिकच्या डिशचा वापर होतो. पण, यामुळे काही क्‍लिष्ट रचना आणि घटक यांचा उलगडा होत नाही, उतींचे वैविध्यही लक्षात येत नाही, असे हेडीलबर्ग युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ऑलिव्हर फॅकलेर यांनी सांगितले.  यासंदर्भातील ताजे संशोधन एका नियतकालिकमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

विविध क्षेत्रांतील संशोधकांचा समावेश
या नव्या संशोधनासाठी प्रथमच इमेज प्रोसेसिंग, सैद्धांतिक जैवभौतिकशास्त्र आणि गणितीय प्रणालीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रत्यक्ष पेशी आणि विषाणूंच्या विचित्र वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. पुढे त्याचेच संगणकीय सिम्युलेशन घडवून आणण्यात आले. यामुळे अशा स्थितीत ‘एचआयव्ही-१’च्या विषाणूचा नेमका कशा पद्धतीने प्रसार होतो, हे संशोधकांना जाणून घेता आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com