फेसबुकची ती एक चाल; झुकेरबर्ग चिंताग्रस्त असल्याने रेटला होता प्रस्ताव

Facebook-and-Insta
Facebook-and-Insta

वॉशिंग्टन - संस्थापकासह केवळ तेरा कर्मचारी असलेल्या इन्स्टाग्रामची खरेदी करून फेसबुकने संभाव्य तगडा स्पर्धकच नष्ट केला. अमेरिकी संसदेच्या न्याय उपसमितीला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून यास पुष्टी मिळते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेसबुकला स्पर्धा नको होती. इन्स्टामुळे सीइओ मार्क झुकेरबर्ग चिंताग्रस्त झाले होते. फेसबुकचे युझर्स इन्स्टाकडे वळतील अशी भिती त्यांना वाटत होती. त्यामुळे संस्थापक केव्हीन सीस्ट्रॉम यांना किंचीतही रस नसताना झुकेरबर्ग यांनी आपला प्रस्ताव पुढे रेटला. नकार दर्शविला तर झुकेबर्ग आपल्या कंपनीला उद्ध्वस्त करण्याचे पाऊल टाकतील का, असा प्रश्न सिस्ट्रॉम यांनी मंडळाच्या सदस्याला केला होता. त्यावर कदाचित असे उत्तर भांडवल गुंतवणूकदार तसेच पूर्वाश्रमीचे फेसबुक कर्मचारी असलेल्या मॅट कोह््लर यांनी दिले होते. कोणत्याही स्थितीत फेसबुकचे धोरण हेच राहील असेही त्यांनी नमूद केले होते.

वाद-प्रतिवाद

  • २०१२ मध्ये इन्स्टाग्रामची ७१५ दशलक्ष डॉलरला खरेदी
  • राष्ट्रीय व्यापार आयोगाकडून खरेदी प्रस्तावाला परवानगीचा झुकेरबर्ग यांचा सुनावणीच्यावेळी युक्तिवाद
  • विश्वासघाताच्या नियमांनुसार स्पर्धा दडपण्याच्या उद्देशाने खरेदी करणे किंवा ताबा घेण्याच्या व्यवहारांना 
  • प्रतिबंध, मात्र हा व्यवहार याचेच उदाहरण असा न्याय समितीचे अध्यक्ष जेरॉल्ड नॅडलर यांचा प्रतिवाद
  • डेव्हिड सिसीलीन यांच्याकडूनही ताशेरे - राष्ट्रीय व्यापार आयोगाने परवानगी दिली असली तरी या व्यवहारामुळे नियम भंग झाल्याच्या मुद्यावर कोणताही परिणाम नाही
  • इन्स्टाच्या १३ कर्मचाऱ्यांकडे एकवेळ महसुल नसताना फेसबुकने खरेदी केल्यामुळे चालना अन्् भरभराट असा झुकेरबर्ग यांचा दावा
  • सध्या फेसबुकच्या वार्षिक उत्पन्नात इन्स्टाचा वाटा २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com